कारंजा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरु केलेली असून, सर्वच बस आगारांचे वाहकाकडे स्मार्ट मशीन दिल्या आहेत. दि .०१/०७/२०२२ पूर्वी, ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना, बस प्रवासाकरीता अर्धे (हाफ) तिकिटासाठी आधारकार्ड/मतदानकार्ड/ पॅनकार्ड/ लायसन्स/ओळखपत्र हे कार्ड ग्राह्य धरून कंडक्टर अर्धे तिकिट देत होते . परंतु आता महामंडळाच्या नियमाप्रमाणे प्रवासाकरीता,एस टी महामंडळाकडून दिल्या जाणारे स्मार्टकार्ड असणेच आवश्यक आहे . कारंजा आगारा मार्फत किंवा बसस्थानका मार्फत पुष्कळ वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीकांनी स्मार्ट कार्ड काढले होते. त्यांची स्मार्ट कार्ड बसस्थानक कारंजा येथे आलेली आहेत परंतु बऱ्याच प्रवाशी नागरीकांनी आपआपली स्मार्ट कार्ड बसस्थानक कारंजा येथून नेलीच नाहीत.त्यामुळे कारंजा बस आगार प्रमुख मुकूंद नावकर, बसस्थानक प्रमुख प्रविण डायलकर, वाहतूक नियंत्रक मानके, संजय भिवकर, आय एस राठोड, संतोष राठोड यांचे आवाहनानुसार, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे त्यांनी प्रसिद्धीकरीता माहिती दिली की, नागरीकांनी आपआपली स्मार्ट कार्ड कारंजा बस स्थानकातून प्राप्त करावी.व ज्या ज्येष्ठ नागरीकांनी अद्यापपर्यंत स्मार्ट कार्ड काढलेले नसतील त्यांनी स्मार्ट कार्ड काढूनच प्रवास करावा . तसेच सध्या एस टी महामंडळाने कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल केलेली असल्यामुळे सर्वच आगारातील वाहकांकडे, तिकीट बुकींग करीता, डिजीटल कॅशलेस मशीन देण्यात आल्या असल्यामुळे प्रवाशांकडे रोख रक्कम नसल्यास एटीएम कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड दाखवून सुद्धा प्रवास करता येईल तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आलेले आहे .