वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- अनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 3 जानेवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले असून यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन स्वराज्य शिक्षक संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष शजी एस बोरकर यांनी केले आहे.
30 सप्टेंबर रोजी मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. यावेळी त्यांनी एक जानेवारी 2024 पासून तुम्हाला पुढील टप्पा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. पण अद्याप पर्यंत त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुन्हा मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन पुकारले आहे अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. अशी तळमळ जी.एस. बोरकर यांनी बोलावून दाखवली.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.