ब्रम्हपुरी येथे राजस्थान मधील सुराना येथे नऊ वर्षीय इंन्द्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्यांनी माठातील पाणी पिल्यामुळे छैला सिंह नामक शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत अमानुष मारहाण केल्याने उपचार सुरु असताना विद्यार्थ्यांची हत्या झाली. त्याला न्याय मिळावा म्हणुन गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषना देत व बिलकिस बानो यांच्या गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या सरकारचा निषेध करत , वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाउपाध्यक्षा लिनाताई रामटेके यांच्या नेतृत्वात कँडल मार्च बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकापासुन ते शहरातील प्रमुख मार्गानी असंख्य सामाजिक महीला कार्यकर्त्यां सह मिरवणुक काढण्यात आली व भीमनगर गुजरी वार्ड ब्रम्हपुरी येथे महामानव विश्वरत्न, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून इंन्द्रकुमार मेघवाल याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी मार्गदर्शन करतांना देशामध्ये न्याय,स्वातंत्र्य, समता,बंधुत्व ही लोकशाही ची मुल्य आपल्या अंगी रुजली पाहिजे, जातीयता नष्ट व्हायला पाहिजे तरच असे विकृत कृत्य कुणाकडून घडणार नाही . असे प्रसंग थांबविण्यासाठी मतभेद विसरुन गावक-यांनी संघटीत व्हावे असे प्रतिपादन प्रा.ज्ञानेश्वर नागदेवते सर यांनी केले . वंचित बहुजन आघाडीचे अश्विन मेश्राम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाली परंतु शोषीत पीडीत मागासवर्गीय समुहातील लोकांवरती अन्याय , अत्याचार थांबलेला नाही . धर्मा- धर्मातील तेढ तसेच जातीवाद, पोटजातीतील अंतर्गत कलह दुर करीत मानवाने मानुसकीचे नाते जोपासले पाहीजे असे मत व्यक्त केले . स्नेहदीप खोब्रागडे यांनी विकृत विचारामुळे देशात अश्या घटनांची अधिक प्रमानात वाढ झालेली आहे. शिक्षकाला गुरुचे स्थान असतांना शिक्षकाकडुन विद्यार्थ्यांची हत्या होने निंदनीय आहे त्यामूळे गुन्हेगारास फाशीची शिक्षा झाली पाहीजे वंचित बहुजन आघाडी या घटनेचा तिव्र निषेध करते असे मत केले . कल्पनाताई खरात यांनी महीलांनी सामाजिक ,कौटुंबिक अन्याय अत्याचाराचा प्रतिकार केला पाहीजे असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन लता मेश्राम यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्यनीय, महामोघलायन भंतेजी होते व प्रमुख उपस्थितीत विजय रामटेके सर, सहारे सर, भसारकर सर,मृणालीनी सहारे, लता मेश्राम, प्रमीला पाटील, संघमीत्रा भसारकर, अनुपमा जनबंधु, मीना समर्थ, गीता कुंभारे, सपना कुंभारे, अस्मीता लोखंडे, कल्पना ठेंगरी, सुलभा राऊत,वनीता बरडे,वीना घोडपागे,तारा घोरमोडे, पारधी मॅडम, जयश्री कुथे,सुप्रीया तलमले,प्रतीभा राऊत, धनश्री राऊत,योगीता रामटेके, ज्योती वावरे, पुनम जनबंधु, इंदिरा ताई व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या
तसेच विविध संघटना,व आंबेडकरी समाजाचे मोठ्या संख्येनी कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन लीनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपुर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....