कारंजा :सर्व व्यापारी बंधु तथा समाजसेवक मंडळींना, आग्रहाची विनंती करण्यात येते की, उद्या श्री गणेशोत्सव विसर्जन असल्यामुळे विसर्जन मार्गाने,आपल्या दुकान, कार्यालय, प्रतिष्ठाना समोरून बाप्पांची भव्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकीमध्ये लेझीम पथक, भांगडा पथकाचे मुले मुली खेळतांना, पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ होत असतात. तसेच श्री गणेशाची मिरवणूक बघायला खेड्यापाड्यावरून महिला - पुरुष येत असतात . त्यांना पिण्याची आवश्यकता भासते . तरी कृपया व्यापारी बंधू तथा समाजसेवक मंडळींनी, आपआपल्या प्रतिष्ठान, दुकाने, कार्यालयावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून, पिण्याच्या पाण्याचे वितरण करावे. अशी नम्र विनंती सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी केली आहे.