तालुक्यातील जोगीसाखरा येथील अस्मिता गेडाम नावाच्या सावित्रीबाईंच्या लेकीला दोन पाल्य असून तिचे दोन्ही पाल्य जोगीसाखरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. परंतु या दोन्ही पालयाकडे जातींचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती पासून तसेच इतर मिळणाऱ्या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. या दोन्ही पाल्यांचे वडील दुर्धर आजाराने ग्रस्त असून खाटेवर पडून असल्याने त्यांची आई अस्मीता गेडाम सुद्धा हतबल झाल्या आहेत.
अस्मीता गेडाम यांच्याकडे जातीचा कोणताही पुरावा नसल्याने त्यांची मुले शिष्यवृती पासून वंचीत राहू नये यासाठी, जोगीसाखरा केंद्राचे केंद्रप्रमुख कैलास टेंभुर्णे यांनी मुलांची आई अस्मीता गेडाम हिला मुलांचे जातप्रमाणपत्र काढण्यासाठी कासवी या गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा कासवी ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रवीण रहाटे यांची मदत घेण्यास सांगितले. त्यानुसार अस्मिता गेडाम यांनी प्रवीण रहाटे यांच्याशी
मोबाईल वरून संपर्क करुन,जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आमच्या कुटुंबात जातीचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे जातीचा प्रमाणपत्र काढण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच माझे पती एका दुर्धर आजाराने खाटेवर असल्यामुळे आपण हतबल आहोत असे सांगितले.
अखेर प्रविण राहटे यांनी त्या सावित्रीबाईची लेक म्हणून तीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. पुराव्याचा शोध घेतला पण तो मिळालाच नाही. अखेर रहाटे यांनी त्या महिलेला घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय वडसा येथे जाऊन गृह चौकशीसाठी अर्ज केला.त्यानुसार आरमोरी येथील तहसिलदार उषा चौधरी यांनी नायब तहसीलदार हरीदास दोनाडकर यांच्याकडे गृहचौकशी करण्याची जबाबदारी दिली. नायब तहसीलदार हरीदास दोनाडकर हे प्रविण राहटे यांच्या सोबत जोगीसाखरा येथे अस्मिता गेडाम यांच्या घरी जाऊन गृह चौकशी करून त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रवीण रहाटे यांनी एका महिलेच्या पाल्याना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न प्रशांशनीय आहे. आता आपल्या मुलांना नक्कीच जात प्रमाणपत्र मिळणार असल्याने व मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग सुकर होणार असल्याने प्रवीण रहाटे, केंद्रप्रमुख कैलास टेम्भूरणे, व महसूल प्रशासनाचे अस्मिता गेडाम यांनी आभार मानले.