वाशिम : यंदा जिल्ह्यात मृगनक्षत्रातच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती.तर निवडक काही भागात शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ सुद्धा आलेली होती. तर काही भागात ऐन पावसाळ्यात स्प्रिंकलरने पाणी देण्याची देखील वेळ आली होती.मात्र सर्व संकटावर शेतकऱ्याने यशस्वी मात केल्यामुळे,यंदा निसर्ग राजाच्या कृपा दृष्टीमुळे दोन चार दिवसाच्या खंडाने का होईना ? परंतु कोठे चांगला तर कोठे रिमझिम पाऊस येत असल्यामुळे यंदा आषाढात पिके चांगली बहरली असल्याचे प्रथमदर्शनी दृष्टीपथास दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्या कडून निंदण,डवरणी, किटक नाशक फवारणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी राजा आज रोजी आनंदोत्साहात आपली कामे आटोपत असून,आषाढी वारी करीता महाराष्ट्राचे आराध्य विठु रखुमाईच्या चरणी " बा पांडूरंगा ..! पुढील काळात यंदा चांगला पाऊस होऊन,आमचा खरीपाचा हंगाम चांगला होऊ दे." असे साकडं घालण्याकरीता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना होत आहे.असे वृत्त शेतकरी मित्र जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.