कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा पंचक्रोशितील सर्वच ग्रामिण भागामध्ये चालू आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने,येथील शेतकरी सुखावला असून,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला प्राप्त माहितीनुसार,तालुक्यातील पेरणीची कामे जवळ जवळ आटोपत आलेली आहेत. समाधानकारक पाऊसामुळे पिके चांगली बहरत असून,लवकरच शेतामध्ये डवरणी आणि निंदनाच्या कामाला वेग येणार असल्याने शेतकर्यांसह, शेतमजूरा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.असे वृत्त आमचे प्रतिनिधी हिंमत मोहकर यांनी कळविले आहे.