कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार व प्रदेश सचिव दिलीप भोजराज यांच्या निर्देशानुसार व उपस्थितीत वाशिम जिल्हाध्यक्ष आमदार अमितजी झनक यांनी वाशिम येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी घोषित केली.
या नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीत कारंजा लाड शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्णी लागली असुन या मध्ये राजाभाऊ डोणगांवकर, अँड.संदेश जैन जिंतुरकर, उमेश शितोळे, विजय देशमुख, रामदास भोने, रमेश पाटील लांडकर , सुदर्शन बेलसरे, वहिद भाई , नितेश राऊत , युनूस बेग, डाॅ. गजानन क्षार, सचिन पाटील , आसिफ खांन व बंडु पाटील पोले यांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेस नेते देवानंद पवार, दिलीप भोजराज, ॲड. दिलीप सरनाईक , राज चौधरी, अमीरखान पठाण, ॲड वैभव ढगे, शोराबखांन पठाण व नवनियुक्त कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.