वाशिम :-
महाराष्ट्रातील सर्वसामान्याचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,भाजपाचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा आमदार लखनजी मलिक यांच्या अभिष्टचिंतनाला कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना आणि करंजमहात्म्य परिवाराच्या अध्यक्ष संजय कडोळे, आदर्श जयभारत सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ.ज्ञानेश्वर गरड,अभा मराठी नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे यांनी हजेरी लावीत त्यांना भेटून हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत,राष्ट्रीय ज्येष्ठ किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनाचा सुद्धा लाभ घेतला. यावेळी आपल्या समाज प्रबोधन किर्तनातून आपल्या विनोदी शैलीने हभप इंदोरीकर महाराजांनी आध्यात्म्या मधून, विचार करण्याजोगे मार्मिक मुद्दे,वारकरी रसिक श्रोत्यांना पटवून रसीक श्रोत्यांकडून चांगलीच दाद मिळवली. याबाबत आमचे प्रतिनिधी प्रत्यक्षदर्शी संजय कडोळे यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार हभप इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाला वाशीम पंचक्रोशी सोबतच, अकोला हिंगोली जिल्ह्यातीलही लाखो वारकरी मंडळीनी उपस्थिती लावल्याचे त्यांना आढळून आले होते. यावेळी आपल्या किर्तनातून बोलतांना हभप इंदोरीकर महाराज म्हणाले. "आपल्या धर्म संस्कृतीचे जतन करणारे हे आमदार आहेत. मी त्यांच्या कार्यकर्ते व तुम्हा श्रोत्यांना सांगू इच्छितो. आपला जिल्हा आपला मतदार संघ आपण तंटामुक्त केला.

आदर्श विवाह करून विवाह केले. व्यसनमुक्ती करून आणि चायनिज बर्जर अशा रोडवरील हॉटेलचे खाणे बंद करून,घरात शिजणारा आहार घेतला आपले आरोग्य सांभळून स्वतःला जपले. शेतकरी यांच्या शेतातील कडधान्याचा भोजनात वापर ठेवला.रसायण मुक्त सेन्द्रिय युक्त शेती केली. एका झाडाचे जरी प्रत्येकाने वृक्षारोपण केले . वर्षभर गरजू गोरगरीबाच्या मुलांना वही पुस्तके वाटप केलीत . तर खऱ्या अर्थाने आमदाराचा वाढदिवस साजरा होईल. तसेच उपस्थित खासदार आमदार यांनी त्यांनी ठणकावून सांगीतले की, आपल्या शासनाकडून तुम्ही शालेय अभ्यासक्रमात संत वांड़मय हा विषयावर अनिवार्य करावयास हवा आहे. त्यांच्या ह्या कार्यक्रमा करीता व्यासपिठावर वाशिम यवतमाळ लोकसभेच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी, वाशिम विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक, रिसोड मालेगावचे माजी आमदार विजयराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, संत ज्ञानेश्वर माऊली भागवत धर्म प्रसारक वारकरी संस्थेच्या भव्य प्रांगणात, रिसोड मार्गावरील वांगी शिवारात, आयोजक शिवशंकर भोईर यांनी केले होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....