ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी -नागभीड तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी एकत्रित येऊन तब्बल एक वर्षाअगोदर युवामित्र सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांच्या स्थापना केली.आज दिनांक २९ जुलै २०२३ ला वर्षपूर्ती झाली.त्या निमित्ताने आज सकाळी १०:०० वाजता संस्थेच्या कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आले. यांतर खेडमक्ता स्मशान भुमीत वृक्ष रोपन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. तेजस गायधने सर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.तुप्ती नागदेवते, प्रा. अंकिता गायधने, संस्थेचे सचिव अरविंद नागोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्षरोपट देऊन स्वागत करण्यात आले.यांनतर युवामित्र सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रा. तेजस गायधने यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये संपूर्ण वर्षभराचे संस्थेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडणी केले. यानंतर प्रा. तुप्ती नागदेवते यांनी संस्था कशा प्रकारे सामाजिक व इतर उपक्रम राबविले जातील याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. अंकिता गायधने, संस्थेचे सचिव अरविंद नागोसे, अमर गाडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे विविध उपक्रम बद्दल माहिती दिली.
यावेळी योगेश नंदनवार, संदीप कामडी, प्रिया नागोसे, देवानंद ठाकरे, निकेश तोंडरे आदी सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. लक्ष्मण मेश्राम सर तर आभार निकेश तोंडरे यांनी मानले.