कारंजा:-जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अखंड अशा तब्बल पंच्याहत्तर फुटाच्या पत्रांचं लेखन केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.याच धर्तीवर या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने पंच्याहत्तर फुटाच्या पत्रांचं लेखन केले.या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या.या पत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचा आविष्कार दाखवीत विविध चित्र काढले आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या.कविता चारोळ्या या माध्यमातुन विद्यार्थी पत्रातून व्यक्त झाले.पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.या पत्रात विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांनी मुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांची आम्ही स्मरण केले व ज्या सैनिकांमुळे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले त्यांचे आभार मानल्याचे सांगितले.जि.प.विद्यालय कामरगावचे मुख्याध्यापक बद्रिनारायण लक्ष्मणराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गोपाल खाडे व संपुर्ण शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.या उपक्रमाला कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.