वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय वाशिम जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन तारीख सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे.या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत अस्सल व-हाडी भाषेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या माणूस द्या मज माणूस द्या .
या भजनाने किर्तनाची सुरुवात झाली, छत्रपती शिवाजी महाराजानी अस्पृश्यता निवारण करुन, स्त्रीयांना मानसन्मान दिला, शेतकरी, कष्टकरी, बारा बलुतेदार व अठरा आलुतेदारांचा उध्दार केला,लढाईला जाताना मुहुर्त पाहिला नाही कि लढाई गडकिल्ले जिंकल्यावर सत्यनारायण पूजा केली नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे बहु आयामी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे, व्यसन विरोधी व रयतेच्या हितासाठी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श जाणते राजे होते असे परखड मत पी एस खंदारे यांनी किर्तनाच्या माध्यमातून व्यक्त केले. किर्तनात साथ संगत नामदेव दिपके,सुनील मनवर,विनोद तायडे,अजय करडे,रवी इंगोले,सुनील सावळे,कुसुम सोनुने,वंदना गायकवाड,
शिवाजी गायकवाड,भास्कर गायकवाड,शंकर गायकवाड यांनी साथ दिली. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.