मांडवा/ वर्धा:-
नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेल्या श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश असलेल्या,महंत साध्वी श्री श्री विजयादेवीजी यांच्या सुमधूर वाणी मधून वर्धा तालुक्यातील मांडवा गावी, श्रीरामनवमी ते श्रीहनुमान जन्मोत्सवानिमित्ताने, श्रीरामकथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर संस्थान मांडवा, श्री गुरुदेव सेवा मंडळ मांडवा, सर्वधर्मिय गावकरी मंडळी व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले असून या कार्यक्रमाचे निमित्ताने गावकर्याचे प्रचंड ऐक्य दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शी विजय पाटील खंडार यांनी संजय कडोळे यांनी कळवीले आहे. बुधवार दि ५ एप्रिल रोजी,व्यासपिठावरून रामकथे निमित्त सुंदरकांड-उत्तरकांड प्रस्तुत करतांना,परमपूज्य महंत साध्वी श्री श्री विजयादेवी यांनी सांगीतले की, "श्री तुलसिदास रचित श्रीरामचरितमानस ग्रंथामधून सांगीतलेले, प्रसंग पटवून देत "मानवाने प्रभू श्रीरामाचे चरित्र्य, लक्ष्मण-भरताचे बंधुप्रेम, सितामाई - उर्मिलेचे पातिव्रत्य, सुग्रीवाचे मित्रप्रेम, हनुमंताची स्वामी निष्ठा, शबरी केवट यांची भक्ती, बिभिषणाची अन्यायाविरुद्धची निती अंगीकारली तर मानवाचे कल्याण होऊन रामराज्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगीतले. रामकथेमधील रावण वधानंतर अयोध्येत परत आल्यानंतर रामराज्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने संपूर्ण मांडवा गावामध्ये घरोघरी रांगोळ्या, भगव्या पताका, तोरणे लावून दिप प्रज्वलीत करण्यात आले आणि कथामंडपामध्ये हजारो महिला पुरुषाने हातामध्ये आरतीचे ताट घेवून आरत्या पेटूवून प्रभू रामचंद्राची महाआरती केली. हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविणारे असल्याचे आपल्या कॅमेर्यात टिपणारे अजय देशमुख यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.कार्यक्रमात मोरेश्वर यादव (फोलाणे) यांनी रामकथेमधील प्रसंगाची झाँकी, मांडवा येथील बालमंडळीद्वारे उत्तमरित्या प्रस्तुत करून श्रीरामकथेतील प्रसंग जीवंत केल्याचे दिसून येत होते.मुळ भिलवाडा राजस्थान येथील असलेल्या नाशीक येथील, श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश परमपूज्य महंत साध्वी श्री श्री विजयादेवी ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आध्यात्मिक कार्याने प्रेरीत होऊन श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरीच्या प्रचार प्रसाराचे कार्य सुद्धा करीत आहेत त्यामुळे विदर्भात त्यांचे शेकडो शिष्यमंडळी आहेत.पैकी कारंजा (लाड) येथील साध्वी श्री श्री विजयादेवीचे अनुयायी, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे,डॉ ज्ञानेश्वर गरड,रामदास कांबळे, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने यांनी त्यांच्या किष्किंधा कांडावरील,श्रीरामकथेला उपस्थिती तर विजय पाटील खंडार, किशोर धाकतोड आदींनी दुसरे दिवशी हजेरी लावली होती. यावेळी समस्त मांडवावासी गावकरी मंडळींनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.महंत साध्वी श्री श्री विजयादेवी यांच्या आज्ञेवरून संजय कडोळे यांनी आध्यात्म्य व आपल्या कारंजा शहरातील सर्वधर्म समभावाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आणि मांडवावासी आणि वर्धा जिल्ह्यातील उपस्थितांना वैभवसंपन्न कारंजा नगरीमधील दत्तावतार श्री नृसिह सरस्वती स्वामी तसेच आद्यशक्ती श्री कामाक्षा मातेच्या दर्शनाला येण्याचे निमंत्रण दिले."
आपल्या प्रतिक्रिया द्या....