कारंजा (लाड) : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) जवळ जवळ संपूर्ण मृग नक्षत्र व आद्रा नक्षत्र आणि जून महिना कोरडा गेल्या नंतर,आमच्या अंदाजानुसार आषाढी पोर्णिमेनंतर मात्र,काही दिवसातच पाऊसाला सुरुवात झाल्याने,सुखावलेल्या बळीराजाने,गेल्या आठवडयात, वाशिम जिल्ह्यासह,कारंजा पंचक्रोशीतील पेरण्या आटोपून घेतलेल्या असून,शेतामध्ये हिरवे कोंब दिसून येत असल्याने सर्वत्र आनंद व उल्हासाचे वातावरण दिसत आहे.मात्र गेल्या चार दिवसा पासून पाऊसाने चांगलाच मोर्चा सांभाळला असून,आज दि 13 जुलै रोजी सायंकाळ ते रात्री पासून 14 जुलै व त्यानंतर,पाऊस येण्याचा अंदाज असून,पुढील 48 ते 72 तास पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भात, भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ,नागपूर कडे जास्त प्रमाणात तर अमरावती,वाशिम,अकोला, बुलडाणा या जिल्हयात कमी अधिक प्रमाणात,विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे, मु रुईगोस्ता ता मानोरा जि वाशिम यांनी दिलेला असून,शेतात काम करणारे, शेतकरी,शेतमजूर,मेंढपाळ धनगर,गुराखी,गोपाळ यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील दहा दिवस तरी लवकरात लवकर घरी परतावे.विजेचा गडगडाट होत असतांना हिरव्या झाडाचा चुकूनही आसरा घेऊ नये.नदी नाल्या काठच्या लोकांनी सावध रहावे.नदी,नाले,खाचखडग्याच्या सडकेवरून व पुलावरून पाणी वाहात असल्यास आपली जनावरे,बैलगाडी,सायकल, मोटार सायकल,एसटी बस,फोर व्हिलर पाण्यातून टाकू नये. विजेच्या खांबाला स्पर्श करू नये. भर पावसात विज जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आधीच प्रकाशाची व्यवस्था करून घ्यावी.पावसाचे प्रमाण जास्त असल्यास शालेय विद्यार्थ्याची विशेष काळजी घ्यावी.असे आवाहन जनहितार्थ, महाराष्ट राज्यस्तरिय पत्रकार परिषदे कडून करण्यात येत असल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....