वाशिम : नुकत्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्यात.परंतु शेकडो मतदाराचे नावं मतदान यादीत नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे शासनाने मतदार नोंदणी मोहीम राबविण्या सोबतच प्रत्येक मतदारांना "अधिकृत मतदार ओळखपत्र" उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे भारतिय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांना विधानसभा निवडणूकीपूर्वी अधिकृत मतदार पत्र दिले पाहिजे. जेणेकरून मतदाराची ओळख पटविल्या जाऊन,बोगस मतदानाला आळा घालता येईल. शिवाय अधिकृत मतदार ओळखपत्र असल्यास नागरिकांना आधारकार्ड अद्यावत (अपडेट) करतांना व इतर शासनाच्या योजना सवलती मिळविण्याकरीता त्याची चांगलीच मदत होईल. त्यामुळे माझ्या अधिकृत मतदार कार्डाच्या मागणीशी सहमत राहून प्रत्येक खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदस्य,माजी नगरसेवक व राजकिय पक्षांनी शासनाकडे व विशेष करून निवडणूक आयोगाकडे मागणी केली पाहीजे.तसेच स्थानिक स्तरावरून अधिकृत मतदार ओळखपत्र देणे शक्य असल्यास जिल्हाधिकारी महोदया यांनी सर्व मतदारांना ओळखपत्र देण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.