ब्रम्हपुरी: रब्बी पणन हंगामासाठी धान विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे . शेतकऱ्यांनी धान विक्री करिता नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी केले होते. महिना लोटत आहे मात्र , मुदत संपत येत असतानाही उन्हाळी धान उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आणि नोंदणीची मुदतही वाढणार नसल्याने शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी , असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी केले आहे .
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही चिमूर, सावली,मूल, पोंभुर्णा चंद्रपूर ,तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते . आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी असते . रब्बी हंगाम 2021 -22 करीता चंद्रपूर मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान पिकाच्या पट्ट्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत . या रबी हंगामाकरिता एनईएमएल (NeML) पोर्टलवर नोंदणी करण्याची ३० एप्रिलपर्यंत मुदत निर्धारित करण्यात आली आहे . मात्र , बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नसून जिल्ह्यात आतापर्यंत 1658 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे . 30 एप्रिल नंतर मुदतवाढ मिळणार नाही.नोंदणी न झालेले शेतकरी आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्री करू शकणार नाही मुदतीच्या आत शेतकऱ्यांनी जवळच्या आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर उन्हाळी धान पिकाचा पिक पेरा असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक सोबत नेऊन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे .