आरमोरी... येथील भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने आरक्षणाचे जनक ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ जयंतीनिमित्त गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना बिस्किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादनही करण्यात आले.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेच्या भावना बारसागडे, कल्पना ठवरे, भारती मेश्राम, वेणुताई ढवगाये विद्या चौधरी, मिना सहारे, कुंदा झाडे, पुष्पा रामटेके, कोल्हटकर, , अंजू सहारे व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्सेस व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.