अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष व मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलाचे ब्रँड ॲम्बेसिडर *डॉ .विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात एसटी अकोला आगर क्रमांक दोन तर्फे प्रवाश्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले.* *दि.11 एप्रिल २०२४ रोजी बस स्थानकावर झालेल्या मतदार साक्षरता कार्यक्रमात अग्रणी दूत विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात उपस्थित प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याचा संकल्प केला.एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती केली त्याचबरोबर चौकशी केंद्रावर उद्घोषकाद्वारा 26 एप्रिल २०२४ रोजी मतदान करावे यासाठी उद्घोषका तर्फे उद्घोषणा दिल्या जात आहेत.*
*उद्घोषना मध्ये दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिव्यांगांना निःशुल्क मतदान केंद्रापर्यंत मतदारांना पोहचविण्याची सेवा देणार आहेत.ज्या दिव्यांगांना हि सेवा उपलब्ध करून पाहिजे असेल त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
यावेळी प्रवासी व कर्मचार्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.एसटि चालक व वाहकांनी प्रवास करतेवेळी प्रवाश्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला.*त्यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या सदस्यांनी प्रत्येक फलाटवर जात प्रवाश्यांना मतदान करण्याबाबत संवाद साधला.राबवा आपला अधिकार होऊन जागृत मतदार अशा उद्घोषणा देत संपूर्ण बस स्थानकावर मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले.मतदार साक्षरता अभियानासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन चे सदस्य अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे, अंकुश काळमेघ, गणेश सोळंके, विजयकुमार वणवे, व आगर क्रमांक दोन च्या सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केले.