नागपुरात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील उमरेड Umred मार्गावरील उमरगाव फाट्या जवळ तवेरा कारने ट्रकला ओव्हरटेक करताना जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये महिलेचा व चिमुकलीचा समावेश आहे.
रात्री 11च्या सुमारास नागपूरकडे एक तवेरा कार 10 प्रवाशांना घेऊन येत होती. nagpur truck tavera accident या भरधाव कारने ट्रकला ओव्हरटेक करत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला व तिने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारमधील सात जणांचा जागीत मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला व एका चिमुकलीचा समावेश होता.
सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावं आहे. अन्य तिघांची नवे अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघाताची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरु केले.