अकोला:- जिल्ह्यातील गरजवंत सकल मराठा समाजाची टीम मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढाला समर्थ व सहभागी होण्याकरता चरणगाव पातुर येथील साखळी उपोषणाचे संयोजक राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात आज सकाळी पातुर येथील तहसील कार्यालयासमोरून मुंबईकडे रवाना झाली आहे. या टीमला भगवा झेंडा दाखवून एडवोकेट भारती देशमुख, मराठाभूषण समाजसेवक गजानन हरणे, अ. भा. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, अ.भा. मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता देवानंद गहीले , मराठायोद्धा गिरीश गावंडे, आदीनी त्यांना निरोप दिला. यावेळी अकोला जिल्ह्यातील अनेक गरजवंत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये रमेश देशमुख , योगेश इंगळे, रामकृष्ण बोराळे अजय कदम, शंकर देशमुख, सुरज देशमुख, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून या टीमला निरोप दिला. यावेळी या टीमने आपल्या सोबत जेवणाखावण्याचे, राहण्याचे, झोपण्याचे ,इंधन काळी सह सर्व साहित्य सोबत घेऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच मुक्काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नसल्याचा संकल्प जाणाऱ्या सर्व गरजवंत सकल मराठा बांधवांनी शपथ घेतली यावेळी निरोप सभेला बोलताना शासनाला इशारा दिला की मराठ्यांना त्वरित आरक्षण द्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा भूषण समाजसेवक गजानन यांनी निरोप समारंभाला मार्गदर्शन करताना दिला. यावळी इतर उपस्थितनी मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय, जरांगे पाटील आगे बढो, आजी झाल्याने परिसर दूमधुमून गेला होता.