कारंजा (लाड) : कारंजा तालुक्यातून वहाणाऱ्या नद्या, डोंगर टेकड्या,वनराई व शासनाकडून मंजूर करण्यात आलेले परंतु सद्यस्थितीत रखडलेले सोहळ काळविट अभयारण्य याचा विकास करून पर्यटकाकरीता हे अभयारण्य खुले करण्यात आल्यास,पर्यटक तसेच विविध वनस्पती-पक्षी-प्राणी अभ्यासकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकतो.शिवाय त्यांच्या आवागमनाने ग्रामिण भागातील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळून त्यांचा लाभ होऊ शकतो.तसेच महत्वाचे म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील कारंजा शहर हे सर्वधर्मिय जनतेचे अतिप्राचिन, ऐतिहासिक असे शहर असून, करंजऋषींनी वसविले असल्याचा उल्लेख करंजमहात्म्य या ग्रंथामध्ये नमूद आहे,येथे शिवछत्रपती शिवरायांनी स्वतः भेट देवून येथील सुवर्ण मोहरांचा खजीना आपल्या हिंदवी स्वराज्याकरीता नेल्याचा सुद्धा उल्लेख आहे.त्याशिवाय निजाम काळात एका अरब व्यापाऱ्याने आपल्या ऊंटावर लादून आणलेली "कस्तुरी"अक्षरक्षः येथील "संगई" या जैन सावकाराच्या वाड्याच्या बांधकामाकरीता आणलेल्या मातीमध्ये टाकून त्या बदल्यात व्यापाऱ्यांनी सुवर्णमोहरा येथून नेल्याचा इतिहास आहे. ह्या काही भाकडकथा नसून सत्य घटना आहेत.कारंजा शहर हे पवित्र जैन धर्मियांच्या जागतिक तिर्थस्थळांमुळे देश विदेशात सुप्रसिद्ध असून,दत्तसंप्रदायातील "श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज" यांचे जन्मस्थळ "आदिशक्ती श्री कामाक्षा मातेचे शक्तिस्थळ" म्हणून ओळखल्या जाते.या देवतांच्या दर्शनार्थ देशविदेशातील भाविकांची येथे दरडोईला वर्दळ असते.परंतु सदरहू शहराचा नावालाही विकास झालेला नाही. येथे "अ" वर्ग तिर्थक्षेत्र मंजूर करून विकासकामे केल्यास ह्या विकास कामातून स्थानिकांना रोजगाराचे साधनं देखील उपलब्ध होऊ शकतात.तालुक्यातील नद्या नाल्यांचा सिंचना करीता उपयोग नाही.तसेच येथील शेतकऱ्याकरीता,संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती असतांनाही शेतमालावर प्रक्रिया करणारे आणि शेतमालावर आधारीत असलेले दाळउद्योग,तेल गिरण्या व इतरही कोणतेच उद्योगधंदे कारखाने नाहीत.माध्यमिक शिक्षणाची पंढरी असणाऱ्या या नगरीत उच्च शिक्षणाची सोय म्हणून वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज),अभियांत्रिकी महाविद्यालय (इंजिनिअरिग कॉलेज),विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) तसेच शासनाचे सामाजिक न्याय भवनसुध्दा नाही.येथील शंकुतला बंद पडली असून प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम अधांतरी आहे.तसेच निदान येथील संस्थानला "अ" वर्ग तिर्थस्थळाचा दर्जा देऊन,श्रीक्षेत्र पंढरपूर शेगावच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्या करीता, "तिर्थक्षेत्र विकास आराखडा" मंजूर करावा. तसेच सोहळ काळवीट अभयारण्याला व शहराला पर्यटन विकास आराखडा मंजूर करावा. ही विदर्भ लोककलावंत संघटना व कारंजेकराची मागणी देखील शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूकीतील राजकिय पक्ष आणि उमेद्वार कारंजा तालुक्यातील तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाच्या ह्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष्य देतील काय ? असा सवाल कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकामधून सार्वत्रिक निवडणूकीतील सर्वच राजकिय पक्ष आणि उमेद्वाराकडे केला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 164