कारंजा : सध्या कारंजा शहरातील,जयस्तंभ चौक ते जुना सरकारी दवाखाना ते रामा सावजी चौकातील बाजार पेठेतील सदोदित वर्दळीचे असणारे रस्त्याचे सिमेंट बांधकाम सुरू असून,त्याकरीता संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करून ठेवण्यात देऊन,अतिशय संथ गतीने काम सुरु आहे.या मार्गात बाजारपेठेतील महत्वाची व्यापारी प्रतिष्ठाने तसेच अत्यावश्यक रुग्नालये असून,अतिशय संथ गतीने होणाऱ्या रस्ते बांधकामामुळे व्यापार्यांना व ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असून,बहुतांश व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला असून, रुग्नालयात जाणाऱ्या रुग्नांना सुद्धा असह्य त्रास सोसावा लागत असून,अत्यावश्यक असलेल्या रुग्नवाहिकेपासून इतरही वाहनांना आपली वाहने दुसऱ्या छोट्या छोट्या गल्लीतून वळवावी लागत आहेत.तसेच दूरवरून जावे लागत आहेत.शिवाय स्थानिक श्रीगुरु मंदिर व जैनमंदिरामध्ये दर्शनार्थ येणाऱ्या, बाहेरगावच्या यात्रेकरुंचे सुद्धा प्रचंड हाल होत आहेत. प्राप्त माहिती नुसार आज घडीला रस्त्याचे काम सुरु आहे.रस्त्याचे काम झाल्यानंतर सांडपाण्याचे नाल्याचे सुद्धा बांधकाम होणार असल्याचे कळते.तसेच दि.19 सप्टेबर 2023 रोजी श्री गणेशोत्सव स्थापना आणि दि.28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुदर्शी निमित्त श्री गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक ह्याच प्रमुख मार्गाने निघणार असून, याच काळात गौरी गणपती म्हणजेच श्री महालक्ष्मी उत्सव सुद्धा असतो.त्यामुळे साहजिकच ह्याच वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी असणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर आणि चांगल्या प्रतीचे रस्ते तयार व्हावेत.अन्यथा ठेकेदाराच्या मनमानीने निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार झाल्यास,नागरिकांच्या सोयी सुविधेकरीता खर्ची करण्यात येणारा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जाणार असल्याची शक्यता कारंजेकर नागरिकांमधून दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेमधून ऐकायला मिळत आहे.