आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा व व नेत्रदात्या स्व.सौ गंगाबाई रामदास सवाई नेत्रदान देहदान जनजागृती समिती च्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक वाशीम यांना दिनांक १२/१२/२०२४ रोजी निवेदन देऊन विनंती केली आहे कि उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे महिन्यातून दोनदा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नियमित करण्यात यावे.
संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी व्यक्त केले कि ग्रामीण रुग्णालय कारंजा असताना महिन्यातून दोन वेळा नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत होत्या सन २००६ पासून याकार्यात आम्ही जनजागृती सहकार्य करायचो परंतु उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर रुग्णालयात रुग्णांची नेत्र तपासणी होते व शस्त्रक्रियेसाठी त्यांना वाशीम ला जावे लागते अश्या मुळे गरजू रुग्ण वंचित राहतात व मोतीबिंदू हा वाढता स्वरूप घेतो आणि रुग्णांचे यात नुकसान होते जिल्हा शल्य चिकित्सक यांना विनंती आहे कि उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर सुरु करावे.मागील काही काळात कारंजा ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या शिबिराचा आढावा घेतला तर या ठिकाणच्या रुग्णसंख्येचा अंदाज येईल.सदर निवेदन हे संस्थेचे प्रकल्प समन्वयक राजू कांबळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात दिले आहे.