आरमोरीतील वर्दळीचा रस्ता म्हणून पालोरा रोड दिवसेंदिवस ओळखीचा रस्ता होत आहे त्यात त्या रस्त्याला गर्दी राहते खेड्यापासून आरमोरी पालोरा रोडवर सामान उतरविण्यासाठी गॅरेज असल्यामुळे तसेच विटा भट्टीसाठी जाणाऱ्या कोंड्याच्या ट्रॅक्टर, लकडा डेपो वरून लकडा वाहतुकीचा रस्ता म्हणून त्यात वर्दळ राहते, खेड्यातून येणारे नागरिक, शाळेचे विद्यार्थी अशी गर्दी असते.आणि त्यात खोब्रागडे हॉट्टेल जवळील विद्युत खांब वरील तारांनी झोला घेतले असल्यामुळे रहदारीच्या वेळेस तारांचा व ओव्हरलोड वाहन्नाच्या स्पर्शाने धोका होऊ शकतो
सदर घटना मंगळवार दि.19.03.2024 ला सायंकाळी 6.00च्या दरम्यान बोरवेलची गाडी गेल्याने तारांचा स्पर्किंग झाल्याने विद्युत पुरवठा बंद झाला होता अश्या प्रकारे आठवड्यातून दोन ते तीनदा घटनेची पुनरावृत्ती होत असते यात दिवसासुद्धा धोका निर्माण झाल्यास विद्यार्थी, प्रवाशी व स्थानिक नागरिक यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याकडे विद्युत मंडळ व ओव्हर लोड वाहणाकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशी स्थानिकांची मागणी होत आहे