पत्रकारांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त यांचेकडे उपविभागीय अधिकारी मार्फत कारवाईची मागणी
ब्रम्हपुरी :-
बोन्डेगांव साजाक्षेत्रातून करोडो रुपयाच्या महसूल चोरीला मुख्य:त्वे तलाठी तथा महसूल विभागाचे आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होतं असून बोन्डेगांव साजा क्षेत्रात मागील महिन्यापासून सुरु असलेल्या हजारो ब्रास मुरूम वाहतूक संदर्भात बोन्डेगांव साजा तलाठी दिशा मेश्राम यांना पत्रकाराने विचारणा केली असता त्या पत्रकारास उर्मट वागणूक देतं पदाची प्रतिष्ठा विसरत जबाबदारी न घेता शिष्टाचार विसरत "तुम्ही पत्रकार आहात चौकशी करा आणि बातमी छापतं बसा मला त्रास नको" असे उत्तर देतं असल्याने बोन्डेगांव साजात करोडोचा महसूल चोरी होतं असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे तसेच अशा असभ्य, उर्मट तलाठी यांचेवर सक्त करण्याची आक्रमक मागणी पत्रकाराच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा विभागीय अधिकारी नागपूर यांचेकडे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत केली आहे.
बोन्डेगांव वार्ड येथे खाजगी जागेमध्ये शेजारील बोडी मधून जेसीबी च्या साह्याने ७ ते ८ ट्रक्टर च्या मदतीने जवळपास ७ फूट खोल पर्यंत मुरूम टाकून भरण भरण्यात ( बुजविण्यात ) येत आहे. याबाबत बोन्डेगांव येथील स्थानिक लोकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, तलाठी बोंढेगाव याचे कडे तक्रार केली असता, सदर काम हे शासकीय कंत्राट पद्धतीनं सूरू असल्याने संबंधीत विभागाकडून रॉयल्टी घेतल्या जातो त्यामूळे आमच्या कडे महिती नसल्यानें महिती उपलब्ध झाल्यावर सांगू असे टाळणारे उत्तर महसूल अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
सदर अवैध माती मुरुम उपसा गेली 20-25 दिवसापासून सूरू असल्याने सदर काम वैध की अवैध याबाबत चौकशी करण्याचे काम महसूल विभागाचे असून याबाबत वेळीच खात्री करून घेणे आवश्यक असते तर एखाद्या विभागाकडून कंत्राटी पद्धतीने काम जरी असला तरी
संबंधीत विभागाकडून महसुल विभागास तसा रीतसर पत्र व्यवहार झाला असता तसे महसूल विभागाने माहिती देणे अपेक्षित आहे मात्र यामागे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला असावा अशी शंका आता नाकारता येत नाही.
सदर उत्खनाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी राजकारणी लोकांचे नावे सांगत एक कंपनी तयार करण्यात येणार असून त्याकरिता हे काम सुरु असल्याचे सांगितले तर बड्या लोकांसाठी सर्व नियम धाब्यावर ठेवून हे अधिकारी चुप्पी साधून बसने योग्य नसून शासनाचा अंदाजे ७ हजार ब्रासच्या रॉयल्टीची करोडो रुपयांची रक्कम बुडविल्याने शासनाचा महसुली लूट होत आहे.तर यावर मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत चौकशी सुरु असल्याचे सांगत असल्याने नक्कीच यात मोठा घबाळ असल्याची शंका नागरिकांना होतं आहे.
पत्रकारांशी असभ्य वर्तवणू करीत "तुम्ही पत्रकार आहात तर मग चौकशी करा आणि पेपर ला बातमी छापूण टाका तुमचा काम कोणता आहे मी रिस्पॉन्स देतं नाही मग मला कशाला विचारता" तर त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली असता "मला माझे कर्तव्य शिकवू नका" अश्या शब्दात उत्तर देत असल्याने तलाठी सदर महसूल चोरीला चालना देतं "शिष्टचाराचे उलंघन" करीत असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे व बोन्डेगांव साजातील शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या मुरूम तस्करांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पत्रकारांच्या शिष्टमंडळाने दिले आहे