रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकेला लंच टाईम नसल्याचे स्पष्ट आदेश असतांना, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ब्रम्हपुरी शाखेत ग्राहकांना ताटकळत ठेवण्याचे व साधारण प्रश्न उपस्थित केले असता बँक कर्मचारी ग्राहकांना असभ्य वागणूक देतं असल्याचे प्रकार समोर आले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ब्रम्हपुरी शाखेत बँकेचे ग्राहक २:०० वाजता नंतर गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी लंच टाईम चा फलक काउंटरवर लावून लंच करत असल्याने बँकेत आलेले ग्राहक कर्मचाऱ्यांची वाट बघत होते. २:३० वाजता कॅश काऊंटर सुरू करण्यात आले .
तेव्हा एका ग्राहकाने बँक कर्मचाऱ्याला आपल्या
बँकेला लंच टाईम आहे काय..? असा एक साधारण प्रश्न विचारला असता, बाहेर बोर्ड लावला आहे तुम्ही बघू शकता असे उर्मट उत्तर दिले. गेटवर जाऊन पाहिले असता बँकेची वेळ सकाळी १०:३० ते ४:०० अशी खोड - तोड करून अस्पष्ट नोंद केली आहे. या बँकेतील कर्मचारी लंच टाईम व इतर ही कामाच्या नावाखाली ग्राहकांना ताटकळत ठेवत असल्याचा प्रकार नेहमीच सुरू आहे.
एका ग्राहकांनी कॅश काउंटर येथे उपस्थित महिला कर्मचारी यांच्याकडे विड्राल करिता पासबुक दिला असता पासबुक पासिंग करिता पुढे पाठविण्यात आले तेव्हा तेथील सूर्यवंशी नामक क्लर्क यांनी ग्राहकांना आधार कार्ड मागितले . ग्राहकांनी आधार कार्ड नाही मात्र नंबर आहे व मोबाईल मध्ये आधार कार्ड चे फोटो असल्याचे सांगितले पण कर्मचाऱ्याने आधार कार्ड घेऊन या नंतरच विड्रॉल मिळणार असे सांगितले. तेव्हा ग्राहकांनी अर्ध्या तासा पासून आम्ही वाट बघत आहोत आणि घरी जाऊन येण्यास आमचा खूप वेळ जाणार कृपया सहकार्य करावे अशी विनंती केली असता, तुम्ही बँक खाता बंद करू शकता..! अशी असभ्य वागणूक सूर्यवंशी नामक कर्मचारी सदरहू ग्राहकांना देतं होते. बँक आपला व्यवसाय वाढावा याकरिता कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती मात्र येथील सूर्यवंशी नामक कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशीच असे वागत असतील तर सदरहू बँकेचे ग्राहक वाढतील की तुटतील हाही प्रश्न उपस्थित होतो.
रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करून रिझर्व बँकेचे नियम पायमल्ली करून धाब्यावर ठेवत लंच टाईम व इतर लहान सहान कारणावरून या बँकचे कर्मचारी ग्राहकांना ताटकळत ठेवत असभ्य भाषा वापरतात त्यामुळे वरिष्ठांनी अशा कर्मचाऱ्यावर व बँकेवर कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने सदर ग्राहकाने रिझर्व बँकेच्या पोर्टलवर तक्रार केली असून पुढे काय कार्यवाही करण्यात येतो याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे.