कल्याण (प्रतिनिधी)- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई प्रदेश पत्रकार महिला आघाडी प्रमुख व ठाणे जिल्हा संघटक सौ.सुषमा ढोले- ठाकूर यांच्या डोंबिवलीतील प्रेमअंश या सामाजिक संस्थेला नवरत्न प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.डोंबिवली येथे हेल्पिंग अॕन्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या एका समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.यावेळी त्यांचे पती विनायक ठाकूर हे सुध्दा उपस्थित होते.या प्रेमअंश सामाजिक संस्थेच्या सुषमा ढोले ह्या संस्थापक- अध्यक्षा आहेत.गिनीज बुक रकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे डॉ.दिनेश गुप्ता, इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष,प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.विजय चिंचोले प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सौ.सुषमा ढोले- ठाकूर ह्या गेल्या १५ ते २० वर्षापासून सामाजिक सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्या पत्रकार आणि कवयित्री सुध्दा आहेत.त्यांच्या प्रेम अंश संस्थेमार्फत त्यांनी वंचितांची आणि वृध्दाश्रमात जाऊन वृध्दांची दिवाळी या नियमित उपक्रमासोबतच,शालेय साहित्य वाटप,निराधारांना मदती,आरोग्य,स्वास्थ,मन:स्वास्थ्याच्या क्षेत्रातील मार्गदर्शन कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर आयोजने केलेली आहेत.गायन,कला आणि शिवकालीन वेषभूषेतून तथा नाटीकेतून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचे उपक्रम सुध्दा राबविलेले आहेत.सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अशा सर्वांगीण सामाजिक कार्याची दखल घेत त्याची प्रमाण पोचपावती म्हणून त्यांना "नवरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
" हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री समीर चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच, अध्यक्षा डॉ प्रियंका कांबळे त्यांच्या आणि संस्थेमार्फत राबविल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती दिली.या सन्मान सोहळ्यात सामाजिक, नृत्य, गायन, साहित्य, शिक्षण, उद्योजक, क्रिडा, कला, संगीत अशा विविध क्षेत्रातील नवरत्नांचा सन्मान करण्यात आला.
प्रेमअंश संस्थे मार्फत मराठी राजभाषा दिवस, वृद्धाश्रमात जागतिक प्रेम दिवस, अनाथ आश्रमात हिवाळ्यात हिवाळी उपयोगी वस्तू आणि उन्हाळ्यात फळं वाटप, अनाथ मुलांना शालेय वस्तु वाटप, दंत चिकित्सा व नेत्र चिकित्सा शिबिर, विट भट्टीवरील आदिवासींना साड्या, कपडे, खेळणी वाटप, अनाथ मुले आणि वृद्धांसोबत जिवलगांचे वाढदिवस, आदिवासी पाड्यात हळदी कुंकू कार्यक्रमातून स्वच्छतेचे महत्व असे अनेक उपक्रम राबविले जातात.
अशा सामाजिक कार्यक्रमात ईतरा़ंच्या मदती देखील मोलाचा सहभाग ठरू शकतात.म्हणून *प्रेमअंश संस्थेच्या विविध उपक्रमांना आर्थिक आणि वस्तू रूपातील मदतीसाठी समाजसेवी मित्रांनी पुढे यावे.त्यासाठी 9967059636 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक- अध्यक्ष सौ.सुषमा ढोले- ठाकूर ढोले यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....