कारंजातालुका विधी सेवा प्राधिकरण व कारंजा तालुका वकील संघाच्या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी कायदेविषयक जाणीव जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारंजा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम एच हक , सहन्यायाधीश सुप्रिया पुंड, कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. निलेश पाटील (कानकिरड ) सरकारी अभियोक्ता नीरज सबरदडे, एड. चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एड. माधुरी राऊत यांनी निसर्ग हा मानवाला भरभरून देतो परंतु त्या बदल्यात मानवाने निसर्गाचा ऱ्हास करून वसुंधरेवर अनन्वित अत्याचार चालविलेले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वसुंधरे बद्दल कृतज्ञ असलं पाहिजे असे विचार मांडले तसेच शैक्षणिक गळती ही मोठी समस्या असल्याने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अभियाना
अंतर्गत म्हणून एड. शीतल कवीश्वर(कानकिरड )यांनी ज्या व्यवस्थेमध्ये मुलांच्या हाती पुस्तक असायला पाहिजे त्या ठिकाणी मुलांच्या हातात दगड जर असेल तर यात त्यांचा दोष नसून हा व्यवस्थेचा दोष आहे त्यासाठी शिक्षणावर असणारी तरतूद नगण्य असून देशातील सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्यात येत असून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचे सुरू असलेले काम हे गरिबांचे शिक्षण नाकारण्याचा व त्यांना वंचित ठेवण्याचा घाटच आहे शिक्षणात असलेली विषमता हे सुद्धा शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अडथळा असून सर्वांना समान शिक्षण ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. गर्भपात
गर्भजल चाचणी कायद्यांतर्गत कारंजा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम एच हक साहेब यांनी गर्भजल चाचणी करणे हे कायद्याने गुन्हi असल्याने मुलगा मुलगी हे समान असून वंशाचा दिवा हा मुलाचा असला पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे महिलांचा वावर असून त्या आघाडीवर आहे भारतीय राज्यघटनेने सुद्धा समानतेचे तत्व स्वीकारले असून लिंग भेदभावर आधारित भेदभाव केलेला नाही असे मत बोलताना व्यक्त केले. यावेळी सरकारी अभियोक्ता चव्हाण यांनी सुद्धा आपले विचार मांडताना अल्पवयात मुलीचे विवाह करणे हे कायद्याने गुन्हा असून बाल वयात कोणत्याही प्रकारे विवाह करू नये असे केल्यास मुलींवर अकाली मातृत्व लागण्यासारखे असून त्यामधून होणारे अपत्य सुद्धा दुर्बल होते त्यामुळे समाजाने यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन एड. अठोर यांनी केले
यावेळी पक्षकार मंडळी तसेच कारंजा तालुका वकील संघाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते