अकोला -- शहराच्या विविध भागामध्ये विकासाचे कामे सुरु असून विकास कार्यात येणाऱ्या शेकडो वृक्षाची कत्तल कंत्रादार किंवा शासकीय यंत्रनेद्वारे नकळत होत असते परंतु वाढते उष्णतामान काँग्रीटची घरे, रस्ते तसेच ऋतुमधील बदलामुळे शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील तापमान चढते राहते त्याकरिता वृक्षरोपण, वृक्ष सवर्धन गरजेचे असून प्रत्येक नागरिकांनी एक कुटुंब एक वृक्ष ही संकल्पना राबविणे गरजेचे असून प्रत्येक गावात प्रत्येक शहरात अमलात आणने गरजेचे झाले आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच रामदेव बाबा नगर शेगाव बायपास येथे वृक्षारोपणाचे कार्य हातात घेतले असून किमान शंभर वर्षाची लागवड करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे या कार्यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन आपलं शहर सुंदर शहर स्वच्छ शहर हिरवे शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांनी जनतेला केले आहे.
या कार्यक्रमाला गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व जय हनुमान बहुद्देशीय संस्था अकोला चे पदाधिकारी कृषी मित्र दिनकरराव घोडेराव हास्य कवी राजाभाऊ देशमुख गजानन घोंगे प्रशांत बानोले वृक्ष मित्र व पक्षी मित्र गजानन गोलाईत सुरेंद्र शिरसाट अरुण मानकर संतोष काटे एडवोकेट संतोष गोळे राजाभाऊ मानकर किशोर वडतकर अमोल हिंगणे गजानन मोरे दत्ता भुसारी अजय आवारे. यांचे सह बहुसंख्येने गुड मॉर्निंग ग्रुपचे व जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते.