आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे आज अकरा वाजे दरम्यान विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.श्री. नानाजी घोडाम असे मृत बैल मालकाचे नाव आहे.नानाजी घोडाम ह्यांचा नातू नेहमी प्रमाणे आपले घरचे बैल, म्हशी, चराई साठी नेत होता. परंतु दोन तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे तो गावाजवळील मोकळ्या जागेत बैल, म्हशी चारत होता. बैल,म्हशी चारत असताना अचानकपणे विद्युत रोहित्रा जवळ बैल गेला असता बैलाला विद्युत शॉक लागून बैल घटनास्थळीच मृत झाला.त्यामुळे बैल मालकाचे अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात आणि शेतीच्या हंगामात बैल मृत झाल्याने बैल मालकाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण ने बैल मालकाला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे करावे . असे बैल मलकासोबत गावातील नागरिकांनी मागणी केलेली आहे.