वरोरा:-
वरोरा तालुक्यातील एकोना, चरुर (खटी)
नायदेव , मोहबाळा या परिसरात वेकोली द्वारे होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे परिसरातील अनेक घरांना भेगा गेल्याने नागरिकांनी याची तक्रार ओबीसी आयोग अध्यक्ष हसराज अहिर यांच्याकडे देन्यात आली होती,या तक्रारीची दखल घेत वेकोली अधिकारी हे मोकाशी ले आऊट परिसरात पाहणीसाठी आले.
एकोणा, चरुर (खटी), मोहबाळा, नायदेव,येथील अनेक घरांना वेकोलि च्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा पडलेल्या आहेत, या परिसरातील मोकाशी ले-आउट, गुरुदेव नगर वृंदावन ले-आउट, येथील रहिवासी सुद्धा या ब्लास्टिंग मुळे भयभीत झालेले आहे वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे हादरे बसून घरातील साहित्य, भांडे हे नेहमीच पडत असल्याने ग्रामवासियानी याची तक्रार मोहबाला चे सरपंच नंदकुमार टेमुर्ड यांच्याकडे केली होती,या तक्रारीची दखल घेत वेकोली अधिकारी दिं २सप्टेंबर रोजी मोकाशी ले आऊट येथे आले, साडेतीन वाजता सुमारास संदीप दुदुलकर यांच्या घरासमोर व्हायब्रोमीटर हे यंत्र लावण्यात आले, नंतर ब्लास्टिंग करण्यात आले असता हलका आवाज आला,तर दुसरा राऊंड मध्येही हलका आवाज आल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले, मात्र अशा प्रकारची ब्लास्टिंग नेहमी होत नसल्याने घराला नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आज दीं २ सप्टेंबर रोजी विकोली अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या या ब्लास्टिंग मुळे नागरिक समाधानी आहेत परंतु अशी ब्लास्टिंग नेहमी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे एवढेच नव्हे तर आज करण्यात आलेली ब्लास्टिंग ही कमी बारुद भरून करण्यात आली असल्याची तक्रार नागरिकांची आहे, एकंदरीत वेकोली अधिकाऱ्यांनी केलेल्या ब्लास्टिंग वर नागरीक समधानी नसल्याचे दिसून येत आहे यावेळी मोहबाळा सरपंच नंदकुमार टेंभुर्डे, दिलीप काळे, आनंदराव टाले, रविशंकर वाटेकर, संदीप दुदुलकर, सीमा पिंपळकर. चंपत वसाखे, मोतीराम निखाडे, गुरुदास आवळे, नंदा कातरकर, मंगला तहारे तर विकोली तर्फे चीफ मॅनेजर ,प्लॅनिंग मॅनेजर ,रामकृष्ण जोशी उपस्थित होते.
मोहसिन सय्यद वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....