कारंजा (लाड) : काही मिनिटात फटाक्यांची आतिशबाजी करून हजारोच नव्हे तर लाखो रुपयांची धुळधाणी आणि वातावरण प्रदूषीत करण्याचे पातक करण्यापेक्षा प्रत्येक सधन कुटूंबाने कमितकमी एका निराधार कुटूंबाला दिपावली निमित्त नविन कपडे, किराणा व थोडीफार आर्थिक मदत केली. तर त्या कुटूंबाचा आनंद बघून तुम्हाला सुद्धा तुमच्या पैशाचे सार्थक झाल्याचे समाधान, त्या कुटूंबाच्या चेहर्यावरचा मनसोक्त आनंद आणि त्यांचे आशिर्वाद मिळतील. चला तर मग मी तर ठरवीले दरवर्षी प्रमाणे एका कुटूंबाला माझ्या परिने माझ्या घासातला घास द्यायचे. असेच आपणही ठरवा. आणि दिवाळीत निरर्थक खर्च ( फटाक्यावर होणारा फालतू खर्च )टाळून एखाद्या असहाय्य, निराधार, शेतमजूर, दिव्यांग कुटुंबाला तुमच्या स्वेच्छेने काहीतरी आर्थिक मदत करून त्यांची दिवाळी साजरी करा. असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी केले आहे.