कारंजा : गोल्डन कार्ड या योजनेतंर्गत सरकार लोकांना "आयुष्मान भारत गोल्डन कार्ड" प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून स्व.अण्णासाहेब ठाकुर ज्ञानदिप विद्यालय लोणी अरब येथील विद्यार्थ्यांना लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फ़त गोल्डन कार्ड चे वाटप करन्यात आले.
PMJAY योजनेचे लक्ष्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आर्थिक ताणतणाव वाढवण्यासाठी आहे. गोल्डन कार्ड असण्याचे काही फायदा म्हणजे संपूर्ण कुटुंब या योजनेत समाविष्ट होऊ शकते.
हे समाजातील गरीब वर्गाला आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते.
लाभार्थी या योजनेचा लाभ देशभरात मोफत घेऊ शकतात.
1354 वैद्यकीय आणि सर्जिकल पॅकेजेस आणि 25 विशेष श्रेणींचा समावेश आहे. जवळजवळ 50 प्रकारचे कर्करोग आणि केमोथेरपीचा खर्च कव्हर होतो.एकाधिक शस्त्रक्रियांच्या बाबतीत, पहिल्या शस्त्रक्रियेचा पूर्ण खर्च, दुसर्याचा अर्धा खर्च आणि तिसर्याचा एक चतुर्थांश खर्च यात समाविष्ट केला जाईल.
डे केअर खर्च कव्हर करते.कोविड रुग्ण देखील हे कार्ड वापरू शकतात.लाभार्थी रोगांचा पाठपुरावा करण्यासाठी सेवांचा लाभ घेऊ शकतात.लोणी अरब प्राथमिक केंद्राचे डॉक्टर अभिलाषा लकडे, समुदाय आरोग्य अधिकारी
देवेंद्र चंद्रशेखर, आरोग्य सेवक वैशाली जावतकर, आरोग्य सेविका वैष्णवी वाघमारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रवण किन्हीकर, रितेश मेश्राम व शाम जाधव उपस्थित होते.