वाशिम : मी काही अर्थशास्त्रज्ञ किंवा राज्यशास्त्राचा अभ्यासक नाही.मात्र वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन भविष्यातील परिस्थितीचा अंदाज नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क करणे कर्तव्य समजतो. आज शासनाने सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात आणि महागाई भत्त्यात भरमसाठ वाढ केलेली आहे. शिवाय शासनाने पुनश्च सत्ता मिळविण्याकरीता लाडकी बहीन, अन्नपूर्णा सारख्या योजना सुरु केलेल्या आहेत.त्याचा प्रचंड ताण शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.परिणामी शासनाच्या निधी मध्ये प्रचंड तुट जाणवणार. नंतर ही तुट भरून काढण्यासाठी निवडणूका पार पडताच, शासनाकडून जी एस टी, इन्कमटॅक्स वाढ करावी लागणार.पेट्रोल-डिझेल-रोड टॅक्सचे भाव वाढणार.रेल्वे तिकीट,एस टी महामंडळाचे प्रवासी दर,विजेचे दर वाढणार. त्यामुळे साहाजिकच सर्वच जीवनावश्यक वस्तूचे,हॉटेल व खानावळीचे म्हणजेच नगदी टॅक्स देणाऱ्या वस्तूचे दर वाढणार. दुर्धर आजाराच्या औषधाच्या किमंती वाढणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.यामुळे प्रतिष्ठित राजकिय व्यक्ती,उद्योगपती आणि सरकारी अधिकारी कर्मचारी यांना काहीच फरक पडणार नाही.मात्र मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडणार. मध्यमवर्गीय आणि गोरगरीब तळागाळातील लोकांना जीवन जगणे कठीण होणार.कारण शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव, हातमजूरी करणाऱ्या आणि शेती व्यवसायातील मजूरांच्या रोजमजूऱ्याचा विचार हे शासन कधीच करीत नाहीत.एवढे मात्र निश्चित.येथील तळागाळातील गोरगरीब सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यांना रोजगार देण्याऐवजी, त्यांच्यापैकी निवडक दहापाच लोकांना एखादे घरकुल,तुटपुंजे चार आठ किलो मोफत धान्य आणि संगायो किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ देऊन झुलवत ठेवल्या जात आहे.त्यामुळे नागरीकांनी येत्या विधानसभा निवडणूकीत डोळे उघडे ठेवून मतदान केले पाहिजे. व आपल्या रोजगारा करीता आग्रही राहून, आपल्या विकासाकरीता राजकीय पक्ष आणि उमेद्वारांना निक्षून सांगीतले पाहिजे. रोजगाराच्या दृष्टीने कारंजा शहरात औद्योगीक वसाहत होऊन उद्योगधंदे सुरू होणे. कारंजा शहराचा तिर्थक्षेत्र आराखडा तयार करून, सोहळ काळविट अभयारण्य पर्यटनाकरीता खुले होऊन रोजगार व लघुव्यवसायाच्या संधी उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत.असे मत समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी केले आहे.