स्व. श्री अशोकराव कोंडे साहेब , विदर्भ वैभव मंदिरचे संस्थापक , सरचिटणीस प्रमुख आधारस्तंभ यांच्या निधनाची शनिवारी दि १९ जुलै रोजी दुःखद बातमी झळकली आणि सर्व वैदर्भीय बांधवांचे मन दुःखाने हेलावून गेले. असंख्य च्याहत्यांनी त्यांच्यावर श्रद्धांसुमनाने श्रद्धांजली अर्पण केली. २० जुलै रोजी गाव बेलज, या अचलपूर जिल्हा अमरावती येथे अग्नी देण्यात आला.
विदर्भ वैभव मंदिरचे सरचिटणीस श्री गजाननरावजी नागे यांनी स्व. श्री अशोकरावजी कोंडे यांना शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करतांना विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ या संस्थेसाठी केलेल्या कार्याचा संक्षिप्तपणे सखोल आढावा विषद केला . तेव्हा सर्वांना त्यांच्या कार्याची महती कळली, अमरावती जिल्ह्यातील तालुके अचलपूर, बेलज या. गावातील मुंबईत सेल टॅक्स आफीस मध्ये अधिकारी पदावर कार्यरत असलेले अशोक कोंडे यांनी विदर्भ वैभव मंदिर या संस्थेची स्थापना साधारण सन 1971 ला यांच्या अथक प्रयत्नातून झाली . सुरुवातीपासून या संस्थेच्या जडणघडणीमध्ये स्व.श्री अशोकराव कोंडे सोबत प्रमुख आधारस्तंभामध्ये केंद्रीय मंत्री स्व. श्री बॅरिस्टर शेषरावजी वानखडे साहेब तसेच स्व. श्री वासुदेवराव पेठे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. मुंबईमध्ये विदर्भीय लोकांसाठी काहीतरी करावं हा एकमेव दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली . अशें कळले की ,त्या काळामध्ये मिटींगसाठी उठण्या बसण्यासाठी सुध्दा जागा नसतांना अनेक अडचणींवर मात करत तेव्हा दादर येथे इमारत उभी केली व बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शासकीय भुखंड मिळविला तिथे पण भव्यदिव्य इमारत उभी राहिली,त्यांनी आपले सामाजिक कार्य सतत् सुरू ठेवले . आपण आज जो वटवृक्ष विदर्भ वैभव मंदिर संस्था रूपाने बघतो आहे त्याचे सर्व श्रेय स्व . श्री अशोकरावजी कोंडे साहेबांना जाते. "मरावे परी कीर्तीरुपे उरावे" या म्हणी प्रमाणे निश्चितच श्री अशोकरावजी कोंडे साहेबांचे कार्य सर्वांच्या स्मरणात अनंत काळापर्यंत राहिल
*श्री अशोकरावजी कोंडे साहेबांचं वैशिष्ट्य असे होते की, त्यांनी आपल्या सोबत बरेचशे सामाजिक कार्यकर्ते घडविलेले आहे. त्यापैकी सर्वात दिर्घ काळ त्यांच्या सान्निध्यात राहिलेले श्री गजाननरावजी नागे साहेब ! निश्चितच अशोकरावांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असणार. म्हणूनच नागेसाहेब सामाजिक ,राजकीय, किंवा धार्मिक क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवीला आहे. गजाननराव नागे यांनी श्री अशोकरावजी कोंडे यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहतांना प्रामाणिकपणे स्पष्ट कबुली दिली की,मी जेकाही आज घडलो आहे त्याचे सर्व श्रेय श्री अशोकरावजी कोंडे यांना जाते ! . म्हणूनच गेली तीन दशके नागेसाहेब विदर्भ वैभव मंदिर संस्था टिकवण्यासाठी टोकाचा संघर्ष करीत आहे त्यात त्यांना यश पण मिळत आहे. मला अशें वाटते की , श्री अशोकरावजी कोंडे यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशीं निश्चितच असणार,
*सागरा सारखे विशाल हृदय आणि सूर्यासारखे तेजस्वी विचार असले की, श्री अशोकरावजी कोंडे सारखे महात्मे जन्मास येतात. त्यांची पोकळी भरून निघणे कठीण आहे .
"प्रेरणा आपली सदैव लाभो....
स्फुरण चढो आम्हा सत् वृत्तीला.....!!!
*विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ यांच्या वतीने श्री अशोकरावजी कोंडे यांना विनम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली