कारंजा (लाड) : मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, शिवाजीनगर कारंजा (लाड) येथील,मानाच्या महागणपतिचे, कारंजाच्या राजाचे आगमन कारंजा येथे शुक्रवारी दि. 06 सप्टेंबर 2024 ला मोठ्या थाटामाटात झाले.यावेळी या महागणपतीची वारकरी मंडळाचे भजन पथक,टाळकरी, ढोलपथ, आणि लेझीम पथकाद्वारे वाजत गाजत मोठ्या हर्षोल्हासात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन मराठा संस्कृतीचे द्योतक असलेले ढोलपथक, श्रीक्षेत्र पंढरपूर वारीतील वारकरी मंडळ,टाळकरी आणि विशेष आकर्षण असलेले लेझीम पथक पाहून कारंजेकर नागरीकांकडून आनंद व्यक्त होत होता.तसेच एवढ्या भव्य दिव्य मिरवणूकी मध्ये डी जे साऊंडला फाटा देण्यात आल्याची चर्चा देखील होती.डी जे च्या प्रचंड साऊंडमुळे आणि डोळे दिपविणाऱ्या लेझर प्रकाश किरणामुळे,मानवाच्या आरोग्यावर घातक असा परिणाम होतो.शिवाय वयोवृद्ध,दुर्धर आजार रक्तदाब,मधुमेह असणाऱ्याग्रस्त व्यक्ती मिरवणूक बघायला येऊ शकत नाही. शिवाय डिजे साऊंडमुळे सध्या हृदयविकार होऊन मानवी मृत्यु होण्याचे प्रमाण वाढत असल्याने डिजेला नागरिकांमधून तिव्र विरोध होत असून,यापुढे डिजे साऊंड लावण्यापेक्षा,वारकरी मंडळ,भजनी मंडळे,लोककलेचे सांस्कृतिक कार्यक्रम,गरबा नृत्य,भागंडा नृत्य व लेझीम पथकाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच मराठा गणेश मंडळ, शिवाजी नगर, कारंजा (लाड) यांचेकडून श्रींच्या आगमन प्रसंगी पारंपारिक वाद्याला महत्व देण्यात आले होते.यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो.नि. दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीसदल तथा गृहरक्षकदलाचा चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.