पाच वर्षांपूर्वी शेतीची अवजारे नांगर विक्री करणाऱ्या आरोपी बघेले (५५) व विनोद गायधने (४०, दोन्ही रा. सीतेपार) यांनी गावातीलच योगराज भैय्यालाल पटले (४०) यांना मारहाण केली. पाच वर्षांपूर्वी विक्री केलेल्या नांगराचे पैसे शिल्लक आहेत म्हणून ते आरोपी मागायला गेले असता आता पैसे काहीच नाही. पैसे नाहीत तर दारू पाज, असे म्हणून त्या लोकांनी दारू पाजण्याची मागणी केली. परंतु त्यांनी दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे दोन्ही आरोपींनी त्यांना सेंटिंगच्या काठीने मारून जखमी केले. ही घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. महेंद्र रतनलाल रिनायत (३६, रा. सीतेपार) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार उईके करीत आहेत.