वाशिम : इ.सन 2014 पासून केन्द्रात भाजपा सरकार स्थापन होताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल योजनेचा कार्यक्रम सुरु केला.परंतु ह्या प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून, गेल्या पंधरा वर्षांपासून,शहरात राहणारे नगर पालिका क्षेत्रातील, प्रजासत्ताक भारतातील मतदार असणारे खरे गरजू भुमिहिन,बेघर,निराधार,दिव्यांग व्यक्ती आणि भटकंती करणारे भटक्या जमातीच्या (N.T.) व्यक्ती व त्यांचे कुटूंबीय वंचितच असल्याचे भिषण वास्तव आहे.आज प्लॉटधारक मध्यमवर्गियांना ( स्वखर्चाने बांधकाम करण्यास समर्थ असणाऱ्या आणि शासकिय जमिनिवर अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमित कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ मिळत आहे.मात्र खरोखर गरजवंत असणाऱ्या खऱ्या खुऱ्या,भुमिहिन असलेले बेघर,निराधार,दिव्यांग,भटकंती करणारे भटके (N.T.) व त्यांचे कुटुंबीय मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलापासून सर्वार्थाने वंचित आहेत.तसेच स्वातंत्र्यापूर्वी पासून अनेक कुटूंब मंदिर,दरगाह इत्यादी संस्थान किंवा प्रार्थनास्थळाच्या आश्रयाने पिढ्यान पिढ्या राहून नगर पालिकेच्या मालमत्ता कराचा नियमीतरित्या भरणा करीत असूनही ह्या कुटूंबीयाकडे नमूना ड नसल्यामुळे शासनाने त्यांना प्रधानमंत्री योजनेपासून कायमच वंचित ठेवलेले आहे.त्यामुळे मंदिर दरगाह इत्यादी संस्थानच्या आश्रयाला राहणाऱ्या आणि शहरातील गरजवंत भूमिहिन,निराधार,दिव्यांग असलेल्या कुटूंबीयांचा शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी प्रशासनामार्फत सर्व्हे करून गरजवंत बेघर भुमिहिनांची माहिती गोळा करून त्यांना शासनामार्फत भूखंड उपलब्ध करून देत भूखंडासह प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांना केली आहे.