येथील शिवाजी चौकातील रहिवासी किरण मनोहर दुमाने या युवकास आठ दिवसांपूर्वी सर्पदंश झालेला होता. त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २३डिसेंम्बर रोजी सकाळी ११.०० वाजता घडली.
सदर युवक आठ दिवसांपूर्वी मच्छी मारण्यासाठी नदीवर गेला असता त्याच्या पायाला एका विषारी सापाने पायाला दंश केला.परंतु या युवकाला चावा घेतल्याचे जाणवले नाही. यानंतर काही वेळाने हा युवक आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तेव्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला गडचिरोली येथील दवाखान्यात पुढील उपचार घेण्यासाठी सांगितले. परंतु सदर युवक हा भरती न होता,थेट घरी परतला. आठ दिवसानंतर त्याची प्रकृती खालावल्याने सदर युवकाला काल दिनांक २३ डिसेंम्बरला सकाळी ११ वाजता पुन्हा आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.रुग्णालयात नेताच डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे पश्चात त्याला आई, वडील,भाऊ असा बराच मोठा परिवार असून दिनांक २३ डिसेंम्बरला सायंकाळी ६.०० वाजता आरमोरी येथील गाढवी नदिघाटावर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.