केवळ वाशीम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात पूर्ण शक्तिनिशी वारकरी संप्रदाय तथा हाडाच्या लोककलावंताकरीता झटणारे एकमेवाद्वितीय असलेल्या,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे यांच्या कार्याचे कौतुक करतांना,बुलडाणा जिल्ह्यातील,सुप्रसिध्द असलेले वारकरी संप्रदायाचे,श्रीक्षेत्र पंढरपूरचे वारकरी असलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ मृदंगाचार्य हभप राजाराम महाराज काटे यांनी म्हटले आहे की,"संपूर्ण जगाला आपल्या किर्तन-प्रवचन-अभंग-भारूड- भजन व सत्संगाद्वारे मानव कल्याणाची,सर्वधर्मसमभावाची, बहुजनांच्या हिताची शिकवण देणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाला,ऐतिहासिक परंपरागत लोककलेला आणि लोककलावंताना अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेशी काय घेणेदेणे ? नाट्य आणि मराठी चित्रपट कलावंताचा आणि आपला कोठे संबध येतो ? मग ... वारकरी संप्रदायाच्या सृजनशिल व्यक्तिनी त्यांच्या मिथ्या भाषणाला आणि खोटारडेपणाला का म्हणून बळी पडावे ? संतभूमी असलेल्या आपल्या स्वतंत्र अशा पुरोगामी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि लोककलावंताना दुय्यम स्वरुपाची वागणूक दिली जाते.ही दुदैवी गोष्ट असून,महाराष्ट्र शासनाने वारकरी संप्रदाय आणि लोककलावंताना राजाश्रय दिला पाहीजे.जगाच्या पाठीवर मानवी मुल्ये शिकविणारा,वारकरी संप्रदायासारखा दुसरा कोणताच संप्रदाय नाही.ह्या संप्रदायाद्वारे व पारंपारिक लोककलेद्वारे केवळ आणि केवळ मानवतेचे शिक्षण दिले जाते.ह्या एकमेव संप्रदायाद्वारे संपूर्ण विश्वात मानवी कल्याणाकरीता शांती,अहिंसा, सद्भावना,परोपकाराची शिकवण दिली जाऊन,पावित्र्य,मांगल्यं व आनंदोत्सव साजरा केल्या जातो. अशा वारकरी संप्रदाय, पारंपारिक लोककलावंताना शासनाने राजाश्रय देवून त्यांच्या कल्याणाचा कार्यक्रम राबवायला पाहीजे.त्याकरीता शासनाने वारकरी संप्रदायाचे किर्तनकार, प्रवचनकार,भारूडकार,संगीत वाद्य वाजवीणारे मृदंगाचार्य, तब्बलजी,हार्मोनियम वादक, पेटीमास्तर,विणेकरी,टाळकरी यांचे करीता संत महात्म्यांचे स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार जाहीर केले पाहीजे.सर्व वारकरी संप्रदायाला व लोककलावंताना विनाअट दरमहा मानधन सुरु करायला पाहीजे.वारकरी शिक्षणाकरीता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी विश्वविद्यापिठ सुरु केले पाहीजे. अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील ज्येष्ठ मृदंगाचार्य हभप राजाराम महाराज काटे यांनी केली आहे. तसेच बुलडाणा जिल्हयासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय तथा लोककलावंताच्या योजना सांस्कृतिक विभाग आणि सामाजिक न्याय विभागाने सक्षमपणे राबविण्याची गरज असल्याचे सुद्धा स्पष्ट केले असून कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेच्या कार्याला शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत.