स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . महिला सक्षमीकरणासाठी विविध रोजगाराभिमुख कार्यक्रम संस्थेतर्फे राबवले जात आहेत . *त्याच अंतर्गत दि.२५ जुलै २०२३ पासून एक महिन्याचे शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.यामध्ये दिव्यांग व सर्वसाधारण महिलांनाही प्रवेश मिळणार आहे*. *दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सदस्य रूपाली तायडे शिवण कलेचे प्रशिक्षण महिलांना देणार आहे. कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वयाचा दाखला व शैक्षणिक कागदपत्र झेरॉक्स प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज भरून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या अपेक्षा अपार्टमेंट क्र२ ,फ्लॅट क्रमांक ७ गणेश नगर,उमरी उमरखेड, अकोला येथील कार्यालयात दि.२४ जुलै २०२३ पर्यंत जमा करावयाचे आहे*. कार्यशाळेत प्रशिक्षणासाठी कापडी पिशवी, पंजाबी ड्रेस व इतर बाबींचा समावेश केला जाणार आहे.
अधिक माहिती करिता दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा* असे आव्हान आयोजन समितीचे अनामिका देशपांडे, पुजा गुंटिवार, श्वेता धावडे,भारती शेंडे,संजय तिडके, विजय कोरडे , नेहा पलन, शुभांगी मानकर व वंदना तेलंग यांनी केले आहे.