चंद्रपूर जिल्हयात वाघ हल्ल्याच्या घटना थांबत नसून वाघ हल्ल्याच्या घटना सतत घडत आहेत. चिमूर तालुक्यातील केवाडा - गोंदोडा परिसरात तेंदूपत्ता संकलन करायला गेलेल्या पती व पत्नीवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याची घटना घडली असल्याची बाब समोर आली आहे.
केवाडा येथील मीना विकास जांभुळकर व विकास जांभूळकर हे पती पत्नी केवाडा परिसरात सकाळच्या सुमारास तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेले असता वाघा ने हल्ला केला.
मिनास वाघाने ठार केले तर विकास याचा थांगपत्ता लागलेला नाही. वाघ हल्ल्यात ठार झालेल्या महीलेचा मृतदेह आढळला असून सोबत असलेल्या पती गायब असल्याची बाब समोर आली आहे. घटना स्थळी वनविभागाची टिम दाखल होवून शोधाशोध सुरू केली आहे.
त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.