कारंजा शहरातील उपजिल्हा रुग्णालय समोरील प्रशासकीय इमारतीच्या आवासात असलेले,श्री संत गाडगे बाबा स्मारक आज रोजी शासनाकडूनच दुर्लक्षित केले जात आहे.ज्या गाडगे बाबानी,संपूर्ण भारताला स्वच्छतेचा आणि समानतेचा मार्ग दाखवीला.स्वच्छतेची दशसुत्री देणारे आधुनिक संत म्हणून ज्यांची ओळख आहे. त्यांचे स्मारक आज जीर्ण अवस्थेत आहे.श्री संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाच्या बाजूला नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याकारणाने सद्य स्थितीत पुतळा दुर्लक्षित झाला आहे,या कारणामुळे सामाजिक भावना दुखावल्या जाऊ नये. याकरिता सदर स्मारकाभोवती सुशोभीकरण करणे व रंगरंगोटी करणे आवश्यक आहे.
सदर स्मारक हे सन २००६ पासून म्हणजेच १७ वर्षांपासून तेथे आहे.असे निवेदन संत गाडगे बाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे, उपाध्यक्ष राजेश चंदन,सचिव रोहित देशमुख,कार्याध्यक्ष भारत हांडगे तसेच सदस्य सुरेश तिडके, प्रदीप भाऊ ई. यांनी नुकतेच वाशीम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस वाशिम, कारंजाचे तहसिलदार कुणाल झाल्टे तसेच कारंजा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले असून सदर स्मारकाच्या सुशोभिकरण आणि रंगरंगोटीची मागणी लावून धरली आहे.