वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये संपन्न झालेल्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ विभागीय एसआयपी अबॅकस स्पर्धेमध्ये,कारंजा येथील मोहित गावंडे संचालित एस.आय.पी.अबॅकस केंद्राने विजेतेपद प्राप्त करून दबदबा निर्माण केला, त्यांना चॅम्पियन पुरस्काराने (तृतीय ) सन्मानित करण्यात आले .
या केंद्राच्या माही चोपडे व राजस्वी वाघमारे
या दोन विद्यार्थ्यांनीनी चॅम्पियन पुरस्कार प्राप्त केला असून, त्यांच्या एकुण 100 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य दाखवत अद्वितीय कामगिरी बजावली.
या विभागीय स्पर्धेसाठी नाशिक धुळे, शिरपूर, जळगाव, अमळनेर, चिखली, वाशिम, कारंजा (लाड) येथील सुमारे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना अवघ्या पाच मिनिटामध्ये 80 समीकरणे सोडवण्याचे लक्ष देण्यात आले होते, त्याचप्रमाणे 5 मिनिटाचा एक पेपर देण्यात आला होता. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड यांचे हस्ते करण्यात आले, या प्रसंगी आ. रणवीर सावरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एस.आय.पी.अकादमीचे व्यवस्थापन संचालक दिनेश व्हिक्टर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी एस. आय.पी. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होत असतो, आणि त्यांच्या अध्ययन क्षमतांचा विकास होत असतो, अर्थात त्यांची एकाग्रता, श्रवण कौशल्य, आकलन, स्मरणशक्ती, निरीक्षण कौशल्ये वृद्धिंगत होत असतात, त्याचप्रमाणे त्यांची अंकगणितीय कौशल्ये विकसित होत असतात, या कौशल्याचे सादरीकरण विभागीय, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या माध्यमातून होत असतात. विद्यार्थी एकाग्रतेच्या बळावर बिनचूक आणि गतिशील समीकरणे सोडवत असतात. आपण आपली स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशी करावी, आपल्या क्षमतेमध्ये आणि गुणवत्तेमध्ये दररोजच्या सरावातून वाढ करत जावी, असा कानमंत्रही दिनेश व्हिक्टर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय प्रमुख राजेंद्र नन्नवरे यांनी केले. सुधीर राठोड यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि एस.आय.पी. अकादमीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी ग्रॅण्ड मास्टर स्तर पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना दिनेश व्हिक्टर यांचे हस्ते एस.आय.पी. अबॅकस अभ्यासक्रम पूर्ण केल्या बद्दल 150 विद्यार्थ्यांना
पदवी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि केंद्रप्रमुखांना एसआयपी अकादमीला वीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. स्पर्धेतील सुमारे 250 विजेत्या विद्यार्थ्यांना आणि 500 बेंचमार्क प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल मोहित गावंडे आणि त्यांच्या पत्नी सौ.काव्या गावंडे यांचा विशेष सत्कार दिनेश विक्टर यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....