स्थानिक प्रगतीनगर कारंजा येथील रहिवासी असलेले, डॉ.अभिषेक रघुनाथराव देवळे वैद्यकीय अधिकारी ग्रा. रु. मारेगाव जिल्हा यवतमाळ .यांचे काल दि. ९/६/२०२२रोजी दुखःद निधन झाले. दि. १०/५/२०२२रोजी कर्तव्यावर जात असता त्यांचा दुचाकीने अपघात झाला त्यात त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्यांना उपचारासाठी सेवाग्राम येथे नेण्यात आले. नंतर विदर्भ हॉस्पिटल अकोला येथे उपचारादरम्यान दि.९ जून रोजी प्रकृती अचानक चिंताजनक झाली. व गत एक महिन्यापासून मृत्यूशी सुरू असलेला डॉ. देवळे यांचा लढा अयशस्वी ठरला.
घरातील कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या मृत्यूने देवळे कुटूंबीयांवर दु:खाचे सावट पसरले आहे.
त्यांच्या पश्चात आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे..
त्यांचा अंतिम संस्काराचा विधी आज त्यांच्या मूळ गावी शेवती येथे करण्यात आला. ईश्वर देवळे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. डॉ.साहेबांच्या आत्म्यास शांती देवो. अशा शोक भावना व्यक्त करीत महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे .