गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून थकीत दरमहा हजार रु.देण्याची मागणी अन्यथा 09 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय वर आक्रोश मोर्चा काढण्याचा आयटक चा इशारा
नागभीड:--
कोविड -19 संदर्भात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासना मार्फत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोविड-19 च्या अनुसंगाणे विशिष्ट जबाबदारी निश्चित करून देण्यात आली होती.जिल्हा स्तरावरून दिलेल्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रात आशा व गट प्रवर्तक हे आपली कर्तव्य ग्राम पंचायत स्तरावर ,गाव स्तरावर पार पाडलेली आहेत.अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता कोविड शी निगडित ईतर कामे केलेली आहेत. आशा व गट प्रवर्तक यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त दरमहा रु.हजार इतकी प्रोत्साहन पर रक्कम अदा करणे बाबत दि.31 मार्च 2020 व 4 जून 2020 अन्वये शासन स्तरावरून कळविण्यात आले होते.त्यानुसार गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून कोरोना काळातील दरमहा रु हजार अदा करण्यात यावे असे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.28 सप्टेंबर 2022 व 21 जून 2023 ,28 ऑगस्ट 2023नुसार आपल्या अधिनिस्त असलेल्या सर्व ग्राम पंचायतिला आदेशित केले होते.
परंतु आता पर्यंत या आदेशाची कुठेही अमलबजावणी झाली नाही तसेच आयुष्मान भारत योजने अंतर्गत आभा कार्ड काढण्यासाठी केलेल्या सर्वेचे प्रती कुटुंब 10 रू.नुसार मोबदला ग्राम पंचायत स्तरावरून देण्यात आले नाही ,जुलै पासूनचे राज्य सरकार चे वाढीव मानधन ही मिळाले नाही उलट आभा कार्ड,गोल्डन कार्ड चा योग्य मोबदला न देता त्यांच्यावर काम करण्यास दबाव आणल्या जात आहे याबाबतीत यापूर्वी सुधा निवेदन देऊही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , घनश्याम राऊत,कॉ.सुनंदा मुलमुले छब्बु मेश्राम, शितल जांभुळे,अनिता पाकमोडे,नेहा लाडे ,हेमा नाकाडे तालुका सचिव आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना यांच्या नेतृत्वात नागभीड पंचायत समिती कार्यालय वर धडक देत मा .प्रणाली खोसरे गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणार असल्याचे थकीत दरमहा रु हजार व आयुष्मान भारत योजने अंतर्गत आभा कार्ड सर्व्हेचे पैसे देण्यासंबंधी ग्राम पंचायतिला आदेशित करावे .अन्यथा आयटक च्या नेतृत्वात 09 ऑक्टोंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय वर विराट मोर्चा काढण्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.
यावेळी संद्या ठोंबरे,ममता रामटेके, आशा शेंडे, शशिकला बोरकर,स्वाती मदनकर,प्रेमलता कोरे,सुनीता मेश्राम यासह तालुक्यातील शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.