भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामर्गावर ठाना पेट्रोल पंपावर जवळ पहाटेच्या सुमारास एका वाहनाला संशयाच्या आधारे अडवून तपासणी केली असता वाहनातून जनावरे बेकायदेशीरपणे कत्तलखान्याकडे पाठवली जात असल्याने निदर्शनात आले.पोलिसांनी ट्रक जप्त करत जनावरांनी सुटका केली आहे.
जवाहरनगर पोलिसांना पोट्रोलिंग करीत असताना एक ट्रक संसयित रित्या आढळून आला. त्या आधारे पोलिसांनी ट्रक ला थांबवून ट्रकची तपासणी केली असून ट्रकमध्ये 32 जनावरें कोंबली होती. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत जनवणारची सुटका गौशाळेत केली असून तिन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करत ट्रक जप्त केला आहे.