राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था भारत आणि स्त्री शक्ती मंच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा लाड येथे रामप्यारी बाई लाहोटी माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थिनींना वृक्षारोपण विषयी माहिती सांगण्यात आली. विदर्भ अमरावती विभागीय अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांनी विद्यार्थिनींना वृक्ष विषयी माहिती सांगून वृक्ष हे काळाची गरज असून प्रत्येकाने दोन लाव झाडे लावलीच पाहिजे आणि वाचवली पाहिजे यावर माहिती दिली. आणि विद्यार्थिनींना झाडे लावण्यासाठी तयार केले .प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोन झाडे लावणार असं त्यांच्याकडून वधवुन घेतले. आणि स्त्री शक्ती मंच संघटने अंतर्गत एक स्पर्धा घेण्यात येणार आहे . ज्यांनी झाडे वाढवली जगवली त्यांना पुरस्कृत केल जाणार आहे सर्व विद्यार्थिनींनी होकार दिला झाडे वाचली तर आपण वाचणार .झाडे जगली तर आपण जगणार. झाड हे जीवन आहे .झाडे आपल्या भविष्याची ची शिदोरी आहे. हे विद्यार्थ्यांना सांगितले. आणि प्रत्येक विद्यार्थी दोन झाडे लावण्यास तयार झालेत. सर्व विद्यार्थ्यांनी दोन झाडे लावण्याचा संकल्प केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका भगवती खेमवाणी,शिक्षक भगवान जाधव सर,सौ सरीता कांबळे,सौ अनिता दाभाडे,सौ माधुरी गावंडे,सौ अनुराधा भेंडेकर,कामक्षा सोने,कु कांता बंड,की मानवी बारस्कर,वंदना कांबळे यांनी सहकार्य केले.