वाशिम : शेतकरी बांधवांना आनंदाची वार्ता देणाऱ्या,हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधतांना सांगितले की, "यंदाचे पाऊसमान चांगले राहणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात समाधान कारक पाऊस होणार आहे.त्यामुळे साहजिकच खरिपाचा हंगाम देखील चांगला होण्याचा अंदाज आहे." असे भाष्य त्यांनी केली आहे.पावसाविषयी आपले अनुमान व्यक्त करतांना त्यांनी कळवीले की,येत्या दि.15 जून 2024 पासून चांगल्या पावसाला सुरुवात होणार असून महाराष्ट्रात, पूर्व पश्चिम विदर्भात पेरणीला देखील सुरुवात होणार आहे.दि. 15 ते 17 जूनला रात्री,दि.18 जूनला चांगला पाऊस होईल. दि. 19 ते 20 जून पर्यंत रिमझिम पाऊस दि.21 जून ते 30 जून पर्यंत जोरदार पाऊस दि.01 जुलै ते 04 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस पूर्व पश्चिम विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात होईल.शिवाय या दिवसात ढगाच्या गडगडाटात आणि विजाच्या कडकडाटात पाऊस होणार असून महाराष्ट्राच्या काही भागात विजा कोसळणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. या काळात दमदार पाऊस झाल्याने निश्चितच शेतकरी शेतमजूरांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण राहून शेतीच्या कामाला दमदार सुरुवात होणार असल्याचे हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी कळवीले आहे.वरील कालावधीत अनेक भागात विजा कोसळण्याचा आणि मुसळधार पाऊसामुळे नदी नाले तुडूंब भरल्याने पूर येण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने महाराष्ट्रातील सर्व विभागातील शेतकरी,शेतमजूर व ग्रामस्थांनी विजा कडाडत असतांना शेतात थांबू नये.तसेच आपली जनावरे, गायी वासरे, शेळ्यामेंढ्या वगैरे विजेच्या खांबजवळ आणि कोणत्याही हिरव्या झाडाखाली थांबवू नये आणि स्वतः देखील पावसा पासून संरक्षणासाठी झाडा खाली थांबू नये.त्याच प्रमाणे पांदण रस्ते,नदी,नाल्याला पूर असतांना,पुरामधून आपली जनावरे,बैलबंडी,मोटार सायकल, फोर व्हिलर किंवा एसटी बस पाण्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.