कारंजा : हवामाना विषयी आपल्या अचूक अंदाजांनी अख्ख्या महाराष्ट्रातील ग्रामस्थ तथा शेतकऱ्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र रुई गोस्ता ता.मानोरा जि. वाशिम येथील हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे मागील तिन दिवसापासून पूर्व पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्हे,अख्खा महाराष्ट्रा सोबतच वाशिम जिल्हयातील सर्वच तालुक्यात वारेवादळ,गारपिटीसह पाऊस कोसळतच असून,शुक्रवारी दि 12 एप्रिलच्या मध्यरात्री ग्रामस्थ जनता गाढ झोपेमध्ये धो धो पावसाच्या कोसळधारा कोसळून शेतकऱ्याच्या उन्हाळी मुग, पालेभाज्या, फळबागा, पपई, संत्रा, आंबा पिकाचे अतोनात असे भरून न निघणारे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून, जिल्हाधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी यांनी सार्वत्रिक निवडणुकाच्या कामातून शेतकऱ्या करीता वेळ काढून त्यांच्या उध्वस्त नुकसानग्रस्त शेतपिकाचे तात्काळ पंचनामे करून निवडणूक मतदानाचे दिवसापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. तसेच दि 13 - 14 एप्रिलच्या सायंकाळी व मध्यरात्री सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ञ गोपाल पाटील गावंडे यांचेकडून देण्यात आला असल्याचे संवादकर्ते संजय कडोळ यांनी सांगितले आहे .